बारामती शहरात आजपासून 
एकदिवसाआड पाणीपुरवठा

बारामती शहरात आजपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा

Published on

बारामती, ता. २७ : येथील नगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिकांचा तांत्रिक बिघाड असल्याने शारदा प्रांगण, कसबा व मार्केटयार्ड या टाक्यांअंतर्गत खालील भागात पिण्याचा पाणी पुरवठा बुधवारी (ता. २८) होणार नाही. त्यानंतर तांत्रिक दुरुस्ती होईपर्यंत एक दिवसा आड पाणी पुरवठा होईल, अशी माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी एका दिली.
कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रियनगर, आमराई, विठ्ठलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदूळवाडी वेस चौक, बुरूड गल्ली, नेवसे रोड कसाब गल्ली, रामगल्ली, विजयनगर या भागात बुधवारी (ता. २८) पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर एकदिवसाआड पाणी येईल.
कसबा टाकीवरील भागामध्ये शिक्षक सोसायटी, साठे नगर, पंचशील नगर, सुतारनेट, शाळा क्रमांक २ परिसर, चांदणी चौक, श्रीराम नगर सावतामाळी नगर, जगताप मळा सटवाजीनगर, मुजावर वाडा येथे बुधवारी (ता. २८) पाणीपुरवठा होईल, त्यानंतर एक दिवसाआड पाणी येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com