बारामतीत चालकावर पोलिसांची कारवाई

बारामतीत चालकावर 
पोलिसांची कारवाई
Published on

बारामती, ता. ३१ : शहरात तीन दिवसांपासून नंबरप्लेटशिवाय व भरधाव, काचांना काळी फिल्म लावून फिरणाऱ्या मोटारचालकावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे २४ मे रोजी काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत असताना भिगवण चौकातून एक काळ्या काचा असलेली गाडी भरधाव निघून गेली. पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न करूनही ती गाडी निघून गेली. त्यानंतर सिटी इन चौकातही वाहतूक पोलिसांनी ती अडविण्याचा प्रयत्न केला, तिथेही कारचालक पोलिसांना न जुमानता निघून गेला. पुढे गांधी चौकातही हीच गाडी पोलिसांच्या इशा-यानंतरही निघून गेली. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर कृष्णा अभिजित क्षीरसागर (रा. माऊलीनगर, प्रगतीनगर, बारामती) हा चालक गाडी चालवित असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. बेदरकारपणे गाडी चालविल्याप्रकरणी न्यायालयात खटला पाठविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com