बारामतीतील मोरोपंत सभागृह तासिका तत्त्वावर द्या

बारामतीतील मोरोपंत सभागृह तासिका तत्त्वावर द्या

Published on

बारामती, ता. ३० : ज्या रसिक बारामतीकरांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कविवर्य मोरोपंत नाट्यगृह उभारले आहे, त्याचा प्रत्यक्षात बारामतीकरांना शून्य उपयोग आहे. बारा कोटींचा खर्च नेमका कशासाठी केला गेला? असा प्रश्न या बारामतीकर उपस्थित करीत आहेत. तासिका तत्त्वावर हे सभागृह कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा वापर होऊन नागरिकांना उपयोग होऊ शकेल, अशी नागरिकांची मागणी आहे.
सांस्कृतिक अभिरुची अधिक संपन्न व्हावी या उद्देशाने, विविध कार्यक्रमांचे सादरीकरण व्हावे, यासाठी ही वास्तू २०१५ मध्ये उभारण्यात आली. तेव्हापासून वर्षभरात १०- १२ कार्यक्रमांचा अपवाद वगळता इतर दिवस हे सभागृह बंदच असते. न परवडणाऱ्या दराचे सभागृह उभारून उपयोगच काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या सभागृहाची आसनक्षमता १२५० इतकी असून, मागील बाजूस चार खोल्या आहेत. वातानुकूलित सभागृह असून, वाहनतळालाही भव्य जागा आहे. रचना उत्तम असून, आवाज व इतर सुविधाही शहराच्या तोडीच्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे नाट्यगृह बारामतीत उभारले खरे मात्र, १० वर्षात या नाट्यगृहाचा रसिकांना फारसा काहीच उपयोग झालेला नाही. भरमसाट शुल्क असल्याने येथे नाटक, कार्यक्रमांचे सादरीकरण करणे संस्थांना अशक्य होऊन बसते.
या नाट्यगृहापासून उत्पन्न नगण्य व खर्च अधिक अशीच १० वर्षांपासूनची स्थिती आहे. वीजबिल, घरपट्टी, देखभाल दुरुस्तीचा खर्च उत्पन्नाहून अधिक असल्याने या सभागृहाचा ना शासनाला ना नागरिकांना फायदा अशी स्थिती झालेली आहे.

पुण्यात ज्या पद्धतीने नाटकाचे तीन तास, त्या अगोदर व नंतरचा दीड तास या पद्धतीने सहा तासांच्या स्लॉटवर नाट्यगृह उपलब्ध करून दिले जाते, त्याच प्रमाणे बारामतीतही कविवर्य मोरोपंत नाट्यगृह दिले, तर त्याचा किमान वापर तरी सुरू होईल. याचा विचार करून शासनस्तरावर निर्णय होणे गरजेचे आहे
- किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com