परिचारिका मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात
बारामती, ता. ५ : जिल्ह्यातील परिचारिका विविध प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मागण्यांबाबत त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलन व त्यानंतर बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आला आहे.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना इतर परिचारिकांसाठी कार्यरत समविचारी संघटनांना सोबत घेऊन येत्या १५ व १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन, निदर्शने तर १७ जुलै रोजी कामबंद आंदोलन व १८ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे या प्रसंगी नमूद केले गेले.
बक्षी समिती परिचारिकांच्या विविध विषयांची सोडवणूक करण्यासाठी २०१७ मध्ये नेमण्यात आली होती. त्या नंतर २०२३ मध्ये या समितीचा दुसरा खंड जाहीर झाला होता. यात परिचारिका संवर्गाच्या वेतन त्रुटीचे निराकरण होणे अपेक्षित असताना, पुन्हा अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिर्देशिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदावरील अन्याय दूर झाला नाही. समकक्ष पदांचा सुधारित वेतनश्रेणी लागू झाल्या परंतु काही पदावर अन्याय कायम राहिला. दुसरीकडे कंत्राटी भरतीच्या निर्णयामुळे संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका संघटनेच्या पदाधिका-यांनी या बाबत माहिती दिली.
या आहेत प्रमुख मागण्या....
• कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात.
• परिचारिकांची कंत्राटी भरती रद्द करावी
• १०० टक्के कायमस्वरूपी पदभरती करावी
• पदोन्नतीने भरायची पदे तत्काळ भरावीत.
• गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित भत्ते मंजूर करावेत.
• परिचारिकांची नियमित पदनिर्मिती करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.