पुणे
निवृत्त तहसीलदारांचे बारामतीत वाहन चोरीला
बारामती, ता. ८ : दुचाकी चोरीच्या घटना तशा नवीन नाहीत, पण चोरट्यांनी आता चार चाकी वाहने चोरीस प्रारंभ केल्याचे समोर आले आहे. शहरातील निवृत्त नायब तहसीलदार विलास करे त्यांची टोयोटा तवेरा मोटार (क्र. एमएच ४२- एच- ३२६२) अज्ञात चोरट्यांनी २ जुलै रोजी पहाटे चोरुन नेली. या संदर्भात विलास करे यांनी शहर पोलिसात चोरीची फिर्याद दिली आहे. पहाटे फिरायला बाहेर पडल्यानंतर विलास करे यांना गाडी जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्यांनी शोधाशोध केल्यानंतर गाडी चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.