बारामतीत आज 
महाआरोग्य शिबिर

बारामतीत आज महाआरोग्य शिबिर

Published on

बारामती, ता. २१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. २२) महारक्तदान व महाआरोग्य शिबिरासारख्या विधायक उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली. सकाळी आठ वाजता नगरपरिषदेसमोरील शारदा प्रांगण येथे शिबिर सुरू होणार आहे. महाआरोग्य शिबिर महिला, पुरुष, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी विनामूल्य खुले असेल. या शिबिरात पुणे व बारामतीतील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून उपचार करणार आहेत. यात हाडे, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, हृदयरोग, मधुमेह, मूत्रविकार, मूत्राशय व किडनीचे आजार, रक्तदाब, ईसीजी, हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन तपासणी, व्हेरिकोज व्हेन्स तपासणी, महिलांसाठी हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शिअम, थायरॉईड, कॅन्सर स्क्रीनिंग, मार्कर टेस्ट, तर लहान मुलांसाठी बालदमा व थायरॉईडची तपासणी होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com