शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Published on

बारामती, ता. २० : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे सुरू केलेल्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ च्या पाचव्या वर्षाची घोषणा नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

या फेलोशिपचे अध्यक्षपद ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर भूषवीत आहेत. गेल्या चार वर्षांपासून कृषी, साहित्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये तरुण नेतृत्व घडविण्याचे काम या फेलोशिपद्वारे यशस्वीपणे सुरू आहे.
यंदा कृषी फेलोशिपमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधणाऱ्या स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करून शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याची दृष्टी असलेल्या प्रत्येक तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
स्टार्टअप्स व इनोव्हेटर्स, डेव्हलपर्स व टेक्नॉलॉजी उत्साही, टेक विद्यार्थी व अभियंते अर्ज करू शकतात. महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व कृषी, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान किंवा तत्सम व्यावसायिक क्षेत्रातील चार वर्षांच्या पदवीधारकास अर्ज करता येईल. या फेलोशिपमुळे निवड झालेल्या तरुणांना केवळ आर्थिक मदतच नाही तर मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि आपल्या कल्पना वास्तवात आणण्याची संधी मिळणार आहे. अर्ज ऑनलाइन www.sharadpawarfellowship.com या वेबसाइटवर सादर करता येतील. ४० अर्हताधारकांची यात निवड होणार आहे.
तरुणांनी आपली सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्ये आणि उद्योजकतेची ऊर्मी या फेलोशिपच्या माध्यमातून दाखवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com