विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था

विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था

Published on

बारामती, ता. ३ : शहरात गणरायाच्या विसर्जनासाठी नगरपरिषदेकडून विविध ठिकाणी ३२ कृत्रिम विसर्जन हौदासह निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.
शहरात १००हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ व हजारो नागरिकांनी घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे गणेशमूर्तींची संख्या विचारात घेता प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे.
यावेळी विसर्जन विहिरीनजीक १० नियंत्रण अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. शहरातील ३२ ठिकाणी जवळपास २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी झाडांच्या फांद्या काढून अडथळे दूर केले आहेत. विसर्जन ठिकाणी प्रखर दिवे व कृत्रिम जलकुंभ व निर्माल्य कलश व्यवस्था केली आहे. येथे अग्निशामक दलाचे पथकही सुरक्षिततेसाठी तैनात असणार आहे.

या ठिकाणी जलकुंड
तांदूळवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर, चिंचकर शाळा तांदूळवाडी, कवी मोरोपंत शाळा, श्रीरामनगर, रुई क्षेत्रीय कार्यालयासमोर, अभिमन्यू कॉर्नर (बनकर वडेवाले जवळ), सूर्यनगरी मंडई शेजारी, अंगणवाडी, सी.टी. इन चौक, जळोची क्षेत्री कार्यालय, जि.प. प्राथ.शाळा, माळावरची देवी मंदिरालगत दोन ठिकाणी, गणेश मंदिरासमोर, सायली हिल, सहयोग सोसायटी गेट समोर, ख्रिश्चन कॉलनी, कॅनॉल पूल, ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, कालव्याशेजारी, वीर गोगादेव मंदिराजवळ, रिंगरोड कालवा पुलाजवळ, सनसेट पॉइंट, शाहू हायस्कूल, पाटस रस्ता, दशक्रिया विधी घाट, कसबा, मोरगाव रस्ता धावजी पाटील कालवा पूल, खरेदी- विक्री पेट्रोलपंपाशेजारी, खंडोबानगर मुख्यचौक, कल्याण पाचांगणे घराशेजारील बाजूस नीरा रस्ता शारदानगर, सातव वस्ती जि.प. शाळा, धो.आ. सातव शाळा जगतापमळा, बालकल्याण केंद्र प्राथमिक शाळा मुक्ती टाऊनशिप फेज दोन, तिरंगा चौक, तुपे बंगल्यासमोरील बाजूस, मलगुंडे वस्ती माधव मलगुंडे घरासमोर, परकाळे बंगला पुलानजीक, शाळा क्रमांक दोन कसबा, माता रमाई भवन, देशमुख समाज मंदिर शाळा एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com