पुणे
बारामतीतून पूरग्रस्तांना मदतीचा हात
बारामती, ता. १० : येथील जायंटस ग्रुप बारामती सहेली व सहेली गोल्ड यांनी सोलापूर परिसरातील पूरग्रस्तांसाठी मदत नुकतीच रवाना केली. बारामतीच्या डॉ. उज्ज्वला शेखर कोठारी यांना माढा येथील डॉ. आडकर यांनी पूरग्रस्त भागातील लोकांना उबदार कपडे, अंथरुण, ब्लँकेट, साड्या, धोतर अशा बाबींची गरज असल्याची माहिती दिली.
जायटंसच्या सदस्य असलेल्या डॉ. कोठारी यांनी तातडीने आपल्या सहकारी सदस्यांना या बाबत कल्पना दिल्यानंतर सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला. एक दिवसात ब्लँकेट, चादरी, बेडशिट, साड्या अशी मदत गोळा झाली. जायंटस सहेलीच्या अध्यक्षा सीमा टाटीया, गोल्डच्या अध्यक्षा शुभांगी वैद्य यांनी कुर्डूवाडी येथे ही मदत रवाना केली. त्यानंतर पूरग्रस्त भागामध्ये डॉ. आडकर यांच्या सहकार्याने या मदतीचे वाटप केले गेले.
13794