पुणे
अनधिकृत बांधकामप्रकरणी बारामतीत महिलेवर गुन्हा
बारामती, ता. १३ : शहरातील कसब्यातील जामदार रस्त्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी बारामती नगरपरिषदेने एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात नगरपरिषदेचे प्रलिपिक फिरोज महेमूद आतार यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने फिर्याद दिली आहे. यात नमूद केले आहे की, जून २०२४ पासून या अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित महिलेस नगरपरिषदेने सर्व कागदपत्रांसह हजर राहण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. संबंधित महिला कधीच नगरपरिषदेत कागदपत्रांसह न आल्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.