बारामतीत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत

बारामतीत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत

Published on

बारामती : येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य भगवान भिसे, उपमुख्याध्यापक सतीश पाचपुते, पर्यवेक्षिका अलका चौधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. विद्यार्थांनी संविधानाविषयी आपले मनोगत सादर केले. विद्यालयातील उपशिक्षक विकास जाधव यांनी संविधान निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केली. भगवान भिसे यांनी भारतीय राज्यघटनेचे आपल्या दैनंदिन जीवनात असणारे महत्त्व विशद केले. संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी काढली गेली, संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. संपदा आगवणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com