बारामतीत दोन प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली
बारामती, ता. २७ : न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेच्या दोन प्रभागांतील निवडणूक पुढे जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
प्रभाग १७ अ ,तसेच प्रभाग १३ ‘ब’मधील उमेदवारांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्वीकारले. या दोन जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारले आहे. या दोन नामनिर्देशन पत्रांबाबत पुढील प्रक्रियेविषयी (छाननी, उमेदवारी माघारी घेणे, आदी) राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
उमेदवारी अर्ज वेळेत न आल्याने सतीश फाळके व अविनाश गायकवाड या दोन उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नव्हते. त्या विरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या दोन्ही उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी अर्ज दाखल केल्याने आता या दोन्ही प्रभागातील निवडणूक प्रक्रीया पुढे जाणार आहे.
दोनदा मतदान
या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे. मतमोजणीदेखील या दोन प्रभाग वगळता ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. प्रभाग १७ अ व प्रभाग १३ ब मधील मतदारांना २ डिसेंबर रोजी व निवडणूक आयोग निश्चित करेल त्या दिवशी पुन्हा, असे दोनदा मतदान करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

