बारामतीत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज
बारामती, ता. २९ : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २ डिसेंबर) मतदान होत असून या मतदानासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषद हद्दीतील तांदूळवाडी हद्दीतील मेडिकोज गिल्ड हॉल व रामगल्ली येथील मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी तैनात असतील. रेल्वे स्थानकासमोरील म.ए.सो.चे ग.भी..देशपांडे विद्यालयात मतदान साहित्याचे वाटप केले जाणार असून त्याच ठिकाणी मतमोजणीही केली जाणार आहे.
कडक पोलिस बंदोबस्त
बारामती नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडकर व चंद्रशेखर यादव यांनी दिली. स्वतः राठोड यांच्यासह तीन पोलिस निरिक्षक, पंधरा सहायक पोलिस निरीक्षक व १६८ पोलिस कर्मचारी तसेच ८१ गृहरक्षक दलाचे जवान पूर्णवेळ तैनात असतील.
मतमोजणी मएसोच्या हॉलमध्ये
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर बुधवारी (ता. ३) म.ए.सो.च्या ग.भी.. देशपांडे विद्यालयाच्या हॉलमध्येच मतमोजणी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ओळखपत्राशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दृष्टिक्षेपात मतदानाची तयारी
एकूण मतदान केंद्र संख्या ११५
दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सोय
दोन मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी व कर्मचारी
एकूण मतदार संख्या १ लाख १ हजार ९९२
नगराध्यक्षपदासाठी १४ तर नगरसेवकपदासाठी १४१उमेदवार
मतदान प्रक्रियेसाठी ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कर्मचाऱ्यांची तीन प्रशिक्षण शिबिरे पूर्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

