बारामतीतील खूनप्रकरणी 
आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

बारामतीतील खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Published on

बारामती, ता. १० : किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याप्रकरणी पनिश उर्फ पांग्या आनंद्या भोसले (मूळ रा. सोनगाव, ता. बारामती) यास जन्मठेप (आजन्म कारावास) व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.सी. बर्डे यांनी ही शिक्षा सुनावली.
सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरात जानेवारी २०२० मध्ये किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत पांग्या याने युवराज आबासाहेब थोरात यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात युवराज थोरात यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सूरज युवराज थोरात यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी प्रमोद पोरे व अण्णासाहेब घोलप, पैरवी अधिकारी गोरख कसपटे, कोर्ट अंमलदार महिला रेणुका पवार यांनी सहकार्य केले. ॲड. ज्ञानदेव शिंगाडे यांना अॅड. विनोद जावळे, अॅड. परिश रूपनवर, विश्वतेज थोरात यांनी सहकार्य केले.

Marathi News Esakal
www.esakal.com