‘इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न’

‘इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न’

Published on

‘पुणे ग्रँड टूर’ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा
जिल्हाधिकाडी डुडी यांचे नागरिकांना आवाहन; बारामती, पुरंदरमधील मार्गांची केली पाहणी
---------------------------------------------
‘इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न’

बारामती, ता. ९ : ‘पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती आणि सौंदर्य जगासमोर आणण्यासोबतच इतिहासात नवीन अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ९) ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या टप्पा-३ मधील स्पर्धा मार्गाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सचिव सचिन यादव, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बारामती तालुक्यात क्रीडा संकुल, ग्रामपंचायत कार्यालय मोरगाव येथे नगसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलिस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, मुख्याध्यापक, विविध संघटनेचे पदाधिकारी आदींना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘प्रशासनाने मार्गावर संपूर्ण स्वच्छता राहील, यादृष्टीने स्थानिकांना विश्वासात घेऊन सूक्ष्म नियोजन करावे, प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायटी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी आदी घटकांनी मिळून मोहिमस्तरावर स्वच्छता मोहीम राबवावी. या टप्पाअंतर्गंत येणाऱ्या गावात स्वयंशिस्त पाळत स्पर्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला उभे राहत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, संगीत, वेशभूषा, नाटक, लोकनाट्य आदी माध्यमाद्वारे खेळाडूंचे स्वागत करावे तसेच उत्साह वाढवावा. असे करताना स्पर्धेला अडथळा निर्माण होणार नाही, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सासवडचे राजेंद्रसिंह गौर, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.

स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याचा मार्ग
सासवड येथील चंदन टेकडी येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव कडेपठार, कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी आणि विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com