बारामतीतील शिबिरात २५० जणांचे रक्तदान
बारामती, ता. १४ : शारदानगर (ता. बारामती) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै. चंद्रभागा शंकरराव काळे देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मृतीदिनानिमित्त बारामतीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये कांतिलाल शंकरराव काळे, रवींद्र शंकरराव काळे, सचिन नंदकुमार काळे, सागर चंद्रकांत काळे, सूरज सुरेश काळे, सुमीत चंद्रकांत काळे, श्रीनिवास सुरेश काळे, विराज दत्तात्रेय काळे, प्रतीक कांतिलाल काळे यांच्यासह काळे कुटुंबीय व इतर सहभागी झाले होते. बारामती एमआयडीसीसह बारामती परिसरातील अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात रक्तदान केले. या शिबिरामध्ये २५० पिशव्या रक्त जमा झाले. बारामती पंचक्रोशीमध्ये सध्या रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने या पार्श्वभूमीवर आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिरासारखा समाजोपयोगी उपक्रम उद्योजक रवींद्र काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी राबविल्याने या उपक्रमात सहभागी झाल्याचे अनेक युवकांनी नमूद केले. दरम्यान, गुरुवारी (ता. १५) प्रथम पुण्यस्मृतीदिनानिमित्त शारदानगर येथे साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

