बारामतीत बसपा निवडणूक लढवणार
बारामती, ता. २२ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याची घोषणा बहुजन समाज पक्षाने केले आहे. उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांच्या आदेशानुसार ही यादी निश्चित केली आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष भास्कर दामोदरे यांनी दिली.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. सामाजिक न्याय, बहुजन हितसंबंध आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवार : गुणवडी : उर्मिला प्रवीण शिंदे, पणदरे : विशाल दिलीप घोरपडे, वडगाव निंबाळकर : अश्विनी रामदास खोमणे, निंबूत गट : संतोष पोपट कांबळे, निरावागज : संजय प्रल्हाद कांबळे.
पंचायत समिती गणांसाठी उमेदवार : वडगाव निंबाळकर : दयानंद मोतीराम पिसाळ, पणदरे : विशाल दिलीप घोरपडे, मुढाळे : ऋतुजा दत्ता बरकडे, गुणवडी : दिव्या बाळासाहेब कांबळे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

