अनेकांत स्कूलमध्ये अक्षराभ्यास विधी
बारामती, ता. २४ : अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल येथे वसंत पंचमीचा सण भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अक्षराभ्यास विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संगीता मिलिंद शहा (वाघोलीकर) यांच्या हस्ते विद्या, कला व संगीताची अधिष्ठात्री देवी सरस्वती यांच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर भावनिक वातावरणात चिमुकल्या विद्यार्थ्यांचा अक्षराभ्यास विधी पार पडला. विद्यार्थ्यांनी पाटीवर पहिले अक्षर गिरवताच त्यांच्या औपचारिक शिक्षणप्रवासाची मंगल सुरुवात झाली. वसंत ऋतूचे प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगांनी संपूर्ण शाळा परिसर उजळून निघाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

