बारामतीत प्रथमच फक्त महिलांसाठी दौड स्पर्धा

बारामतीत प्रथमच फक्त महिलांसाठी दौड स्पर्धा

Published on

बारामती, ता. २७ : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने बारामतीत प्रथमच केवळ महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन, बारामती हेल्थ क्लब व बारामती रनर्स यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी याबाबत माहिती दिली.
२९ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता तिरंगा सर्कल (तीन हत्ती चौक) येथून ही दौड सुरू होणार असून संपूर्ण भारतातील १९ वर्षांपुढील मुली व महिलांसाठी ५ व १० किलोमीटर अंतराच्या शर्यती घेण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी तीन हजार महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीसे, पदके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धेनिमित्त बाहेरगावाहून सहभागी स्पर्धकांसाठी श्री सिद्धेश्‍वर मंदिर, जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गार्डन, मेडिकल कॉलेज, सनसेट पॉइंट आदी ठिकाणांचे मोफत बारामती दर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण व आहार मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ डॉक्टर व फिटनेस प्रशिक्षक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com