शेवटच्या संभाषणात सर्व जातीधर्मांचा विचार
बारामती, ता. ४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वी काही क्षण त्यांनी साधलेल्या शेवटच्या संवादाचा ऑडिओ कॉल बुधवारी (ता. ४) बारामतीत माध्यमांना ऐकविला गेला.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील श्रीजित पवार या अजितदादांच्या पुतण्याने त्यांना निवडणुकीच्या उमेदवारासंदर्भात एक मेसेज केला होता, तो वाचून अजित पवार यांनी त्यांना फोन केला होता. हा फोन कॉल श्रीजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजून ३७ मिनीटांनी केला गेला. विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वीचा एका मिनिटाचा हा कॉल असल्याचे आता पुढे आले आहे. त्यामुळे शेवटचे संभाषण अजित पवार यांनी श्रीजित यांच्याशी केले होते, हे आता स्पष्ट झाले आहे.
एका माळी समाजाच्या उमेदवारीबाबतचे हे संभाषण होते. अजित पवार यांनी या कॉलमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना अध्यक्षपद दिल्याचे, तसेच सुपे गटातही माळी समाजाला संधी दिल्याचे नमूद केले आहे. एका मिनिटाच्या कॉलमध्ये त्यांनी आपली राजकीय भूमिका श्रीजित पवार यांच्यासमोर मांडत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेच सांगितले.
बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेत हे रेकॉर्डिंग ऐकविले गेले. या प्रसंगी नगराध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, महिलाध्यक्षा अनिता गायकवाड हेही उपस्थित होते.
म्हणून ऐकविले रेकॉर्डिंग
अजित पवार हे कायम सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राजकारण समाजकारण करीत असत, सर्वांना संधी मिळावी ही त्यांची भावना होती, शेवटच्या क्षणीही त्यांच्या मनात तोच विचार होता, ही बाब सर्वांना समजावी, यासाठी हा कॉल सर्वांना ऐकविण्याचा निर्णय घेतल्याचे श्रीजित पवार यांनी या वेळी नमूद केले.
रेंजमध्ये आल्याने कॉलची शक्यता
बारामती विमानतळावर उतरताना मोबाईलला रेंज आल्यामुळे विमानातूनच अजित पवार यांनी श्रीजित पवार यांच्याशी संपर्क साधला, असे यातून दिसत आहे. अपघाताची वेळ आणि कॉलची वेळ विचारात घेता अजित पवार यांचा हा अखेरचाच कॉल होता, हे स्पष्ट झाले आहे.
कोण आहेत श्रीजित पवार
गोविंदराव पवार हे अजित पवार यांचे आजोबा होते. गोविंदराव पवार यांचे सख्खे बंधू ग्यानबा पवार व गुलाबराव पवार होते. ग्यानबा पवार यांचे चिरंजिव असलेल्या तुकाराम पवार यांचे श्रीजित हे नातू आहेत. नात्याने अजित पवार यांचे श्रीजित पवार हे पुतणे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

