राज्यभरातील लोकांकडून 
पवार कुटुंबीयांचे सांत्वन

राज्यभरातील लोकांकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

Published on

बारामती, ता. ४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बुधवारीही (ता. ४) बारामतीत राज्यभरात लोकांनी मोठी गर्दी केली होती. बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी लोक पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत होते.
आज संध्याकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई पवार हे देखील सहयोग या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर काही काळ त्यांनीही राज्यभरातून आलेल्या लोकांची भेट घेतली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार जय पवार व इतर सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये झालेल्या बैठकीस शरद पवार यांच्या समवेत पार्थ पवार व जय पवार हे दोघेही उपस्थित होते. बैठकीतील विषयांचा तपशील नेमका समजला नसला तरी अजित पवार यांच्या नियोजित स्मारकाविषयी या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
BMT26B14395

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com