स्मारकाबाबत पवार कुटुंबियांची बैठक
बारामती, ता. ५ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ५) पवार कुटुंबियांची विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय एकत्रित चर्चा करत निर्णय घेत असल्याचे चित्र गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. बुधवारीही विद्या प्रतिष्ठानमध्ये झालेल्या बैठकीस पवार कुटुंबीय उपस्थित होते. गुरुवारीही शरद पवार यांच्यासमवेत प्रतिभाताई पवार, पार्थ व जय पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार, रजनी इंदुलकर आदी उपस्थित होते.
अजित पवार यांचे भव्य स्मारक व्हावे, या दृष्टीने या बैठका सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेमकी जागा कोणती असावी, कशा पध्दतीचे हे स्मारक असावे, याबाबत बैठकांचे सत्र सुरु आहे. स्वतः शरद पवार हेही या प्रसंगी उपस्थित राहत आहेत. शरद पवार यांनी बुधवारी सकाळी पार्थ व जय पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेतल्यानंतर स्वतः ते व प्रतिभाताई पवार हेही ‘सहयोग’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांनी नागरिकांचे सांत्वन केले. गुरुवारीही पवार कुटुंबियांनी एकत्र येत स्मारकाबाबत सविस्तर चर्चा केली आणि पाहणीही केली.
दरम्यान, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले, त्या जागीही पवार कुटुंबियांनी भेट देत अजित पवार यांच्या स्मृती जागविल्या. पवार कुटुंबियांच्या सांत्वनासाठी येणारे असंख्य नागरिक आजही अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होताना दिसत होते. अनेकांना या ठिकाणी आल्यावर अश्रू अनावर होत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

