

बारामती, ता. ५ : तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणाच्या निवडणुकीतील मतदान व मतमोजणी प्रक्रीयेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली.
जिल्हा परिषद गटामध्ये ३१ तर पंचायत समितीसाठी ४३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणूकीसाठी २५ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, ४० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ६ भरारी पथकामध्ये १८ आणि ८ स्थिर निरीक्षण पथकामध्ये २४ तसेच १२ व्हिडीओ निरीक्षण पथकामध्ये ३६ तसेच २ व्हिडीओ व्हिंविंग पथकामध्ये ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण १९४५ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षकगण नियुक्त केलेले आहेत. निवडणूक घोषित झालेल्या क्षेत्राची लोकसंख्या ३ लाख १६४ असून, त्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरिता १ लाख ३५ हजार ७३ पुरुष, आणि १ लाख २९ हजार ५६० महिला, इतर ९ असे एकूण २ लाख ६४ हजार ६४२ इतकी मतदारसंख्या आहे.
एकूण २९९ केंद्र
बारामती तालुक्यात २९९ केंद्र आहेत. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे महिला मतदान केंद्र, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटफळ येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोर्लेवाडी, गंगुबाई काटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, नवमहाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पणदरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी येथे ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.