अजित पवार यांच्या कार्याचा समृद्ध दस्तऐवज तयार होणार
बारामती, ता. १७ : महाराष्ट्राच्या राजकारणात “कामाचा माणूस” म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनप्रवासातील अनमोल क्षण जतन करण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. छायाचित्रे व चित्रफितींच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा समृद्ध दस्तऐवज तयार करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ अजितदादांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य केले. पहाटेपासून सुरू होणारी त्यांची कामाची धडपड रात्री उशिरापर्यंत सुरू असायची. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते, विकासासाठीची तळमळ आणि जनतेप्रति असलेली बांधिलकी या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये मानली जातात.
दादांच्या सहकाऱ्यांकडे, कार्यकर्त्यांकडे व मित्रपरिवाराकडे त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांतील छायाचित्रे व व्हिडिओ उपलब्ध असण्याची शक्यता आहे. ही सामग्री एचडी गुणवत्तेत पाठविण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी केले आहे.
यासाठी ourdada@viitindia.org या मेलवर छायाचित्रे टाकली तरी चालणार असून अधिक माहितीसाठी अभिषेक ८८७९८८७००९ यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमातून अजित पवार यांच्या कार्याचा व्यापक दस्तऐवज तयार होणार असून त्यांच्या आठवणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

