बनावट वेबसाईटस्, ई-चलन लिंकपासून सावध राहा
बारामती, ता. १९ : वाहनधारक व चालकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट संकेतस्थळे, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलन सेवांच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती व बँकिंग तपशील चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. काही अज्ञात व्यक्ती मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे ‘आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरा’ किंवा ‘आपला परवाना निलंबित होणार आहे’ अशा आशयाचे संदेश पाठवून अनधिकृत पेमेंट लिंकद्वारे पैसे उकळत आहेत.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, विभागीय परिवहन कार्यालयाकडून नागरिकांना कधीही व्हॉट्सॲपवरून पेमेंट लिंक पाठविली जात नाही. ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशा अज्ञात एपीके फाईल्स डाऊनलोड केल्यास मोबाइलमधील ओटीपी, बँकिंग माहिती व अन्य संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका संभवतो.
नागरिकांनी वाहन नोंदणीसाठी VAHAN (https://vahan.parivahan.gov.in), ड्रायव्हिंग लायसन्ससाठी SARATHI (https://sarathi.parivahan.gov.in), अधिकृत परिवहन सेवा (https://www.parivahan.gov.in) तसेच ई-चलन भरण्यासाठी (https://echallan.parivahan.gov.in) या gov.in डोमेनवरील अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. .com, .online, .site किंवा अन्य डोमेनवरील संकेतस्थळांवर माहिती नोंदवू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

