स्मार्ट मीटरचा ग्राहकांना ‘शॉक’
बारामती, ता. २० : शहरातील शेकडो वीज ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (ता. २०) दुपारी अचानकच खंडीत झाला. बराच प्रयत्न करूनही हा वीजपुरवठा सुरळीत होत नाही म्हटल्यावर महावितरणने चौकशी केल्यानंतर वीजबिल न भरल्याने थेट मुंबईतूनच वीजपुरवठा खंडीत झाल्याचे समोर आले.
नवीन स्मार्ट मीटरच्या माध्यमातून थकबाकीदारांचा वीजपुरवठा आता थेट मुंबईतूनच खंडीत होणार असल्याने वेळेत वीजबिल भरण्याशिवाय आता पर्यायच राहणार नाही. वीजबिल थकीत असल्यास या पुढील काळात वीजपुरवठा सुरळीत राहू शकणार नाही. राज्यातील अडीच लाखांहून अधिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. २०) दुपारी दीडच्या सुमारास अचानक बारामतीतील शेकडो घरांचा वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर पळापळ सुरू झाली. अनेकांनी तातडीने वीजबिल भरले, त्या नंतरच त्यांचा वीजपुरवठा सुरू झाला. जवळपास पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडीत राहिल्याची माहिती महावितरणने दिली.
दरम्यान, बारामती उपविभागात ५३ हजार वीज ग्राहकांपैकी आजपर्यंत १९ हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवून पूर्ण झाले असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. बारामती विभागातील आज ९२१ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणने वीजबिल न भरल्याने खंडीत केला होता.
महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे यादी आल्यानंतरच मुंबईतून अशा पद्धतीने वीजपुरवठा खंडीत झाल्याचे अधिकाऱ्यांना समजले. महावितरणच्या इतिहासात स्मार्ट मीटर बसल्यानंतर प्रथमच अशा प्रकारे थेट मुंबईतून वीजपुरवठा खंडीत केला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

