बारामती शहर राष्ट्रवादीच्या
महिला अध्यक्षांचा राजीनामा

बारामती शहर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांचा राजीनामा

Published on

बारामती, ता. २१ : येथील शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात एका महिलेचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून वादंग निर्माण झाल्याने बारामती शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी आपला पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे शनिवारी (ता. २१) पाठविला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास काही आठवड्यांचाही कालावधी उलटलेला नसताना शारदा प्रांगणातील शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात एका महिलेचा वाढदिवस साजरा करतानाची छायाचित्रे व क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर अनिता गायकवाड यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. या राजीनाम्यावर अद्याप सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला नसल्याचे समजते.
दरम्यान, बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनिता गायकवाड या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवीत होत्या, मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांचे पद कायम ठेवण्यात आले होते.
दरम्यान, आपल्याला काही जणांनी लक्ष्य केल्याचे अनिता गायकवाड यांनी नमूद केले. तरीही पक्षाच्या प्रतिमेस बाधा येऊ नये, यासाठी आपण स्वतःहून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com