

बारामती, ता. २२ : येथील सूर्यनगरी परिसरात घरफोडी करून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
श्रीकांत अशोकराव बिरादार (रा. सूर्यनगरी) यांच्या घरी ७ फेब्रुवारी रोजी चोरीची घटना घडली होती. बिरादार हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सायंकाळी घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांच्या निदर्शनास आले. घरातील सोन्याचे मिनी गंठन, काप, एअररिंग, दोन अंगठ्या, चांदीचे पैंजण व सुमारे १० हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण सुमारे २ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. पत्नी मुलाला खेळवण्यासाठी खाली गेल्या असताना दरवाजा पुढे लावलेला होता. त्याचवेळी चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, सूर्यनगरीतील ‘सुमन रेसिडेन्सी’ येथे सुरेंद्र वामनराव चव्हाण यांच्या घरातूनही ३५ हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती.
या तपासादरम्यान पोलिसांनी तांदुळवाडी (ता. बारामती) येथून ऋषिकेश विजय कोकाटे (वय २१, रा. अंबिका नगर, इंदापूर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने चोरीची कबुली देत दागिने इंदापूर येथील सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय २५) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार कुलथे यालाही अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलिस अंमलदार केदारनाथ बिडवे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राहुल मखरे, सुरेश लांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवाळे, अभिजीत एकशिंगे यांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.