सायन्स ऑलिंपियाडच्या परीक्षेत लडकत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
बारामती, ता. २३ : सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशनच्या (एसओएफ) वतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिंम्पियाड परीक्षेत लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील २५० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ‘ए’ ग्रेड प्राप्त केली.
विज्ञान विषयात आठ, तर गणित विषयात १० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले. समर्थ हिवरकर व पूनम कालेल यांची द्वितीय लेव्हल परीक्षेसाठी निवड झाली. आदर्श ठोंबरे याने गणित विषयात ९५.१२ टक्के गुण मिळवत देशात १६३२वा क्रमांक मिळविला आहे.
सुवर्णपदक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सिद्धी, जय जगताप, प्राजक्ता दोडमिसे, समर्थ हिवरकर, मानव पवार, शिवेंद्र सिंग भापकर, ज्ञानेश्वरी नवले, श्रावणी कदम, शर्वरी कुताडे, सुजय लोखंडे, वेदांत सुरवसे, यशराज जाधव, मयुरेश कुदळे, पूनम कालेल, मंदारसिंह भोसले, शिवश्री कांबळे व आदर्श ठोंबरे यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष नामदेव लडकत, सचिव गणेश लडकत, खजिनदार दत्तात्रेय लडकत, संचालक चंद्रशेखर लडकत, संचालिका शुभांगी व प्रियांका लडकत, तसेच प्राचार्य रामचंद्र वाघ व तानाजी गवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

