बारामतीतील नगरसेवक आक्रमक

बारामतीतील नगरसेवक आक्रमक

Published on

बारामती, ता. २६ : येथील नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासाठी झालेल्या पहिल्याच बैठकीत गुरुवारी (ता. २६) नगरसेवकांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर किती जागरूक आहोत हे दाखवून देत आक्रमकपणे मुद्दे मांडत प्रशासनास धारेवर धरले.
नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, गटनेते संजय संघवी व मुख्याधिकारी पंकज भुसे उपस्थित होते. नगरसेवक सुनील सस्ते, आरती गव्हाळे शेंडगे, नवनाथ बल्लाळ, जय पाटील, नीलेश इंगुले, विष्णूपंत चौधर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, अमर धुमाळ, भारती शेळके, सोमनाथ गजाकस, राहुल वाघोलीकर, अल्ताफ सय्यद, राजेंद्र सोनवणे, प्रतिभा खरात, अनुप्रीता ताबे, दर्शना तांबे, संपदा चौधर, सविता जाधव, मनीषा बनकर, गणेश जोजारे, अमोल कावळे, गोरख पारसे, विशाल हिंगणे यांच्यासह इतरही नगरसेवकांनी अनेक मुद्द्यांवर प्रशासनास धारेवर धरले. नगराध्यक्ष सचिन सातव व गटनेते संजय संघवी यांनी अनेक मुद्द्यांवर खुलासे करत नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये नगराध्यक्षांनी सर्वच नगरसेवकांना बोलू देण्याची भूमिका घेत या पुढील काळातही नगरसेवकांना विश्वासात घेत सभागृह चालविणार असल्याचा संदेश दिला. नगरसेवकांच्या सूचनांची दखल न घेणाऱ्या कर्मचारी व विभागप्रमुखांबाबत कारवाईच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना केल्या.

हे मुद्दे गाजले
घरपट्टी, भाडेकरूंवरील कर, पाणीपट्टीची चुकीची वसूली, जेथे भुयारी गटार नाही तेथे त्य कराची वसूली, वाहन दुरुस्ती, जेसीबीचा झालेला अतिरिक्त खर्च, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमाबाबतचा विषय, श्रीधर स्वामी सभागृहाचे भाडे रक्कम ताळेबंदात न दिसणे, झेरॉक्स मशीनचा दाखविलेला तब्बल २७ लाखांचा खर्च, खोदाई केलेल्या रस्त्यांची न केलेली दुरुस्ती यांसह अनेक मुद्द्यांवर नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. अनेक मुद्द्यांवर प्रशासनास समाधानकारक खुलासा करता आला नाही. एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांचे घर भाडेतत्त्वावर दिले आहे, त्यांना वार्षिक ७२ हजार रुपये भाडे येत असताना घरपट्टी दीड लाखांची आल्याचा मुद्दा मांडून प्रशासनास धारेवर धरले गेले.

शाळांचा दर्जा सुधारा
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी नगरपालिका हद्दीत आता १७ शाळा आलेल्या असून नगरसेवकांनी या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नगरपरिषद शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्याला जर स्वतःचे नाव लिहिता येत नसेल तर ही दुर्दैवी बाब असून यात नगरसेवकांच्या मदतीने सुधारणा करण्याचा निर्धार त्यांनी बोलावून दाखविला.

मिलिंद संगई, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com