बारामतीत तपासणी मोहिमेत 
१५ शालेय बसवर कारवाई

बारामतीत तपासणी मोहिमेत १५ शालेय बसवर कारवाई

Published on

बारामती, ता. २६ : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शालेय बस विशेष तपासणी मोहिमेत बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील ७७ बसेसची तपासणी करण्यात आली. यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ शालेय बसवर कारवाई करून ६७ हजारांचा दंड वसूल केला गेला. या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयुसी), मुदत संपलेल्या, इतर कागदपत्रे व रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या दोषी शालेय बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मोटार वाहन निरीक्षक यांनी शाळांना भेटी देऊन बसेसच्या विधिग्राह्य नसलेल्या कागदपत्रांचे नुतनीकरण करणे, शालेय बस नियमावलीचे पालन करणे, रस्ता सुरक्षा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापक व वाहनचालकांना सूचना दिल्या. पालक आणि अन्य नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार करता तपासणी मोहीम राबविली गेल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतरही विशेष तपासणी मोहीम सुरुच राहणार आहे. सर्व शालेय बस आणि इतर वाहनचालकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com