पत्नीच्या खुनाप्रकरणी पतीस जन्मठेप
बारामती, ता. २७ : पत्नीचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मयूर गोरख गायकवाड (रा. ओम शक्तीछाया हॉस्पिटलसमोर, यवत, ता. दौंड) यास बारामती येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी (ता. २६) हा निकाल दिला.
आरोपीने त्याची पत्नी प्रमिला मयूर गायकवाड हिचा चारित्र्यावर संशय घेत तसेच माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून गळा आवळून खून केल्याचे न्यायालयीन सुनावणीत सिद्ध झाले. पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव केल्याचीही बाब तपासात पुढे आली. अरुण रामदास जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तपासी अधिकारी बी. एन. गावडे यांच्या साक्षीला न्यायालयाने महत्त्व दिले. सरकारी वकील अॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची (सश्रम कारावास) शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद भोगावी लागणार आहे. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम २०१ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस व यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कोर्ट अंमलदार वेनुनाद तुकाराम ढोपरे (बारामती) व पैरवी अधिकारी गोरख कसपटे यांनी कामकाज पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

