बारामती नगरपरिषदेचे गाळेधारक दुहेरी कात्रीत
बारामती, ता. २७ : शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या गाळेधारकांकडून जागाभाडे व घरपट्टी, अशी दुहेरी करवसुली होत आहे. ही अन्यायकारक आहे, यातील घरपट्टी माफ करावी, अशी मागणी बारामती नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत करण्यात आली.
नगरसेवक नीलेश इंगुले यांनी हा मुद्दा मांडला. घरपट्टीची वसुली नगरपरिषद करताना ज्यांच्याकडे मालकी आहे, त्यांच्याकडून ती करते. बारामतीत नगरपरिषदेच्या मालकीची अनेक उद्योग भवन असून त्यातील गाळेधारकांकडून दर महिन्यात नगरपरिषद भाडे वसूल करते. यामध्ये या गाळ्यांची मालकी संबंधित गाळेधारकाची कधीच नसते तर ती कायमस्वरूपी नगरपरिषदेचीच असते. असे असताना अशा गाळेधारकाकडून वार्षिक घरपट्टी व जागाभाडे असा दुहेरी कर वसूल करणे अन्यायकारक व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याचा मुद्दा नीलेश इंगुले यांनी मांडला. सभागृहातील इतरही काही नगरसेवकांनी याला दुजोरा दिला. मालक नगरपरिषद स्वत: असेल तर घरपट्टी नगरपरिषदेने भरायला हवी, जागा भाडेकरूकडून ती वसुली कशी काय होऊ शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत नगराध्यक्ष सचिन सातव व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी शासनाचा अभिप्राय मागविला जाईल, असे नमूद केले आहे. वर्षानुवर्षे हीच पद्धत रूढ असल्याने जागाभाडे व घरपट्टी हे दोन्हीही कर भाडेकरूकडूनच वसूल केले जातात, असे नगरपरिषद सूत्रांनी नमूद केले. याबाबत आता शासकीय अभिप्राय नेमका काय येतो याकडे गाळेधारकांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

