बारामतीत अजित पवारांना आदरांजली

बारामतीत अजित पवारांना आदरांजली

Published on

बारामती, ता. १ : येथील विद्या प्रतिष्ठान परिवारातर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गदिमा सभागृहात शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, हितचिंतक आणि विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अजित पवार यांच्या भगिनी नीता पाटील, जय पवार यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त डॉ. राजीव शहा, मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल (निवृत्त) श्रीश कंभोज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक तसेच संस्थेचे विश्वस्त यांनी अजित पवार यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांची कार्यपद्धती, दूरदृष्टी आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. “एक महिना उलटून गेला, तरीही हा धक्का पचवणे कठीण आहे,” अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com