बारामतीत अडीच कोटींचा गांजा हस्तगत

बारामतीत अडीच कोटींचा गांजा हस्तगत

Published on

बारामती, ता. २८ : शहरातील जळोची पिंपळी रस्त्यावर शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला ४७० किलो गांजा शहर पोलिसांनी शनिवारी (ता. २८) जप्त केला.
बाजारभावानुसार या गांजाची किंमत तब्बल दोन कोटी ३५ लाख रुपये इतकी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेटटी यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.
गोपनीय सूत्रांकडून गांजाबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली.
एक किलोच्या तब्बल २७० पॅकेटमध्ये हा गांजा ठेवण्यात आला होता. विक्रीसाठीच हा गांजा आणण्यात आला होता, मात्र बारामती शहरात गेल्या दोन तीन दिवसात सुरू असलेली पोलिसांची नाकाबंदी विचारात घेत गांजा तस्करांनी हा माल तेथेच टाकून पळ काढल्याचे गणेश बिरादार यांनी नमूद केले. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
बारामतीत एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेल्याने अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे उघड झाले आहे. आता सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या तस्करांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला असल्याचे बिरादार व राठोड यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com