बारामतीमध्ये विद्यार्थ्यांनी काढली ग्रंथदिंडी

बारामतीमध्ये विद्यार्थ्यांनी काढली ग्रंथदिंडी

Published on

बारामती, ता. ८ : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली. दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी बोधकथा, पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संतसाहित्याच्या हस्तलिखितांचे प्रकाशन यावेळी झाले.
विद्यार्थ्यांनी भाषण, गीतगायन, मातृभाषेच्या संवर्धनावर आधारित पथनाट्य, छत्रपती संभाजी राजेंच्या जीवनावर पोवाडा, पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ या नाटकातील नाट्यछटा तसेच संत एकनाथांच्या भारुडाचे सादरीकरण केले.
मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी मनोगतात मराठी ही मातृभाषा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्या डॉ. हिमगौरी वडगावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी भाषा दिन आणि मराठी गौरव दिन यांतील फरक स्पष्ट केला. प्रा. संजय शेंडे यांनीही विद्यार्थ्यांशी हसत-खेळत संवाद साधत भाषेतील गमतीजमती उलगडल्या.
मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे भास्कर गायकवाड यांनी लहान वैज्ञानिक प्रयोगांतून दैनंदिन जीवनातील संकल्पना स्पष्ट केल्या. कार्तिकेयन यांनी विज्ञानाचे व्यवहारातील महत्त्व अधोरेखित केले.
विज्ञान प्रदर्शनात पूर्वप्राथमिक विभागाचे ६५ तर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे २२५ असे एकूण २९० प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, नियामक मंडळ सदस्य राजीव देशपांडे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य पी. बी. कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com