बारामतीत वीज थकबाकी ७३ कोटींंवर
बारामती, ता. ३ : बारामती परिमंडळात वीजबिलांची थकबाकी तब्बल ७३ कोटी ३१ लाख रुपयांवर पोहोचली असून, मार्चअखेर वसुली मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक अशा विविध वर्गवारीतील सुमारे ४ लाख ४१ हजार ग्राहकांकडे ही थकबाकी प्रलंबित असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
मंडळनिहाय थकबाकीचा आढावा घेतला असता, बारामती मंडळात १ लाख ३ हजार ग्राहकांकडे २० कोटी ६३ लाख रुपये, सातारा मंडळात १ लाख ४० हजार ग्राहकांकडे १५ कोटी ३१ लाख रुपये, तर सोलापूर मंडळात १ लाख ९७ हजार ग्राहकांकडे ३७ कोटी ३५ लाख रुपये इतकी थकबाकी आहे.
थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली असून, ग्राहकांनी चालू व थकीत वीजबिले तातडीने भरावीत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास सिंगल फेजसाठी ३१० रुपये व थ्री फेजसाठी ५२० रुपये (जीएसटी अतिरिक्त) पुनर्जोडणी शुल्क आकारले जाणार आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळावर, तसेच ‘महावितरण’ मोबाईल ॲपवरून नेटबँकिंग, क्रेडिट- डेबिट कार्ड, मोबाईल वॉलेट आदी माध्यमांतून ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

