टीसीमध्ये सेवानिवृत्तांचा विसावा आनंद मेळावा
बारामती, ता. ५ : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विसावा आनंद मेळावा पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनसिंग जगताप हे होते. या वेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सेवानिवृत्त सदस्य, नातेवाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, नव्याने सेवानिवृत्त झालेले सी. बी. चौधरी, डॉ. जे. डी. देशपांडे, विजय मेहता, अशोक साळुंखे आणि अरविंद हेडावू यांचे स्वागत केले गेले.
टीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रामीण प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच महाविद्यालयाला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. राहुल शहा-वाघोलीकर, मंगला जगताप, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, प्रा. डॉ. धनसिंग जगताप, उपप्राचार्य डॉ. सचिन गाडेकर, शिक्षकेतर कर्मचारी डॉ. अमोल पाटील, प्रतिभा देवकाते, अक्षय सावंत, भास्कर बागुल, एस. एस. पळशीकर यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी राहुल वाघोलीकर, प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, बी. एस. माने, जे. डी. देशपांडे, प्रतिभा देवकाते आणि डॉ. अमोल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सुरेश साळुंखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वसंत बेलदार यांनी प्रस्तावना, विद्याधर महामुनी यांनी कार्यवृत्ताचे वाचन तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

