टी. सी. कॉलेजमध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर राष्ट्रीय परिषद
बारामती, ता. ५ : येथील तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या वतीने ‘इमर्जिंग ट्रेंडस इन डिजिटल टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे ऑनलाइन पद्धतीने नुकतेच आयोजन केले गेले.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. निरंजन शाह यांनी स्वागत केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग सी. कळकर यांनी उद्घाटन व प्रमुख भाषण करताना डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अॅनालिटिक्स तसेच आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा शिक्षण व उद्योग क्षेत्रावर होणारा परिणाम स्पष्ट केला. डॉ. अभिषेक दीक्षित यांनी आभार मानले.
तांत्रिक सत्रात गुजरातच्या सरदार पटेल विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. कामिनी शाह यांनी डिजिटल व्यवस्थापन आणि व्यवसाय अभ्यासातील बदलत्या प्रवाहांवर मार्गदर्शन केले. नोएडातील अमिटी विद्यापीठाचे संचालक डॉ. मोहित वर्मा यांनी आधुनिक व्यवस्थापनातील नवोन्मेष आणि कौशल्यविकास या विषयावर विचार मांडले.
दुपारच्या सत्रात संशोधन निबंध सादरीकरणासाठी दोन स्वतंत्र ट्रॅक आयोजित करण्यात आले. ट्रॅक एकचे अध्यक्ष प्रा. विशाल शहा, तर ट्रॅक दोनचे अध्यक्ष प्रा. सलमा शेख होत्या. देशभरातील संशोधकांनी डिजिटल तंत्रज्ञान, ई-व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, मानव संसाधन व्यवस्थापन आणि शाश्वत व्यवस्थापन या विषयांवरील संशोधन निबंध सादर केले. तांत्रिक अहवाल प्रा. विशाल शहा यांनी सादर केला.
समारोप सत्रात तमिळनाडूच्या गांधीग्राम ग्रामीण संस्थेचे कुलगुरू डॉ. एन. पंचनाथन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. दीपाली चव्हाण यांनी अहवाल सादर केला. डॉ. डी. पी. मोरे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. धनंजय बागुल, अधिष्ठाता डॉ. निरंजन शाह आणि आयोजन सचिव डॉ. दीपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

