बारामतीत देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
बारामती, ता. ६ : शहरातील भिगवण रस्त्यावरील प्रणव लॉजवर बारामती तालुका पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) सायंकाळी मोठी कारवाई केली. परराज्यातील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आसाम आणि पश्चिम बंगालमधील चार तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ महादेव खोमणे (रा. सावळ, ता. बारामती), धीरज रामभाऊ जाधव (रा. जालना), सागर संजय सोडबुके (रा. बारामती), मेराजुल जानीफ अली (रा. गोलपारा, आसाम), अफजल मझीबर रहमान हुसेन (रा. बरपेटा, आसाम) आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन (रा. बरपेटा, आसाम) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण रोडवरील प्रणव लॉजमध्ये बाहेरून महिला आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत आणि पथकाने या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आसाममधील तीन (वय ३०, २१, २६) आणि पश्चिम बंगालमधील एका (वय २२) तरुणीची सुटका केली. या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गरिबीचा फायदा घेत आरोपी त्यांना वेश्याव्यवसायाला प्रवृत्त करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, युवराज पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

