वसुंधरा कृषि वाहिनीवरून ऑनलाइन सुरक्षेचे मार्गदर्शन
बारामती, ता. ६ : इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (भारत सरकार) यांच्या माहिती सुरक्षा शिक्षण जागरूकता कार्यक्रमांतर्गत विद्या प्रतिष्ठानच्या वसुंधरा कृषि वाहिनी या कम्युनिटी रेडिओवरून फेब्रुवारी महिन्यात ‘ऑनलाइन सुरक्षा आणि सावधगिरी’ या विषयावरील कार्यक्रमांची मालिका प्रसारित करण्यात आली. डिजिटल अटक, ऑनलाइन शॉपिंग स्कॅम्स, गुंतवणूक घोटाळे, बनावट नोकरीच्या ऑफर, फिशिंग, आर्थिक सुरक्षा, ऑनलाइन बँकिंग व युपीआय व्यवहार, मोबाईल सुरक्षा तसेच सोशल मीडिया गोपनीयता व सुरक्षा उपाय अशा विविध विषयांवर या कार्यक्रमांतून श्रोत्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी नागरिकांनी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले. तर, सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती व अभ्यासक्रमांसाठी www.staysafeonline.com या संकेतस्थळाला भेट देण्याचेही आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेन्द्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज तसेच व्हीआयआयटीचे संचालक डॉ. आनंद देशमुख व प्रशासकीय अधिकारी संजय जगताप यांनी प्रोत्साहन दिले होते.
आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व तंत्रज्ञानाशी कमी परिचित असलेल्या व्यक्तींना याबाबत माहिती द्यावी. सायबर धोक्यांना ओळखावे आणि त्यापासून सुरक्षित रहावे. इतरांनाही याबाबत जागरूक करावे.
- आशा मोरे, केंद्रप्रमुख, वसुंधरा वाहिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

