बारामतीत स्वच्छतेसाठी ''महाअभियान''

बारामतीत स्वच्छतेसाठी ''महाअभियान''
Published on

बारामती, ता. ९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वच्छ व सुंदर बारामतीचे स्वप्न साकारण्यासाठी शहरात विविध संस्था आणि प्रशासनाच्या वतीने महास्वच्छता अभियान राबवले जात आहे. मात्र, एकीकडे नागरिक उत्स्फूर्तपणे रस्ते व दुभाजक स्वच्छ करत असताना, दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व कचरा टाकणाऱ्या विघातक मानसिकतेचे आव्हान कायम असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली दर शुक्रवारी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत सर्व नगरसेवक आणि स्थानिक संघटना सहभागी होत आहेत. शहरातील रस्ते, पदपथ आणि दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. विशेष म्हणजे, दुभाजकांना रंगरंगोटी केल्यानंतर काही वेळातच त्यावर गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार घडत असल्याने स्वच्छता प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. नीरा डावा कालवा आणि रिकाम्या भूखंडांवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांची मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. ''थुंकणाऱ्यांनी थुंकत राहावे, आम्ही स्वच्छता करत राहू'' असा निर्धार करत अनेक संस्थांनी पहाटेपासूनच स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. सुजाण नागरिकांनी आता विधायक कामात सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांनी केले आहे.
4595

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com