पुस्तकांच्या दुनियेत रंगणार बारामती

पुस्तकांच्या दुनियेत रंगणार बारामती

Published on

बारामती, ता. १७ : वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने बारामती आणि परिसरातील वाचकांसाठी सकाळ प्रकाशनातर्फे २० ते २२ मार्च दरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामतीतील भिगवण चौकातील भगिनी मंडळ हॉल येथे पुस्तक महोत्सव होणार असून, पुस्तकप्रेमींना विविध दर्जेदार पुस्तके पाहण्यासह व खरेदीची संधी मिळणार आहे.
या महोत्सवात सकाळ प्रकाशनाच्या विविध क्षेत्रांतील दर्जेदार साहित्याचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे.
‘महाभारत कथामृत’, ‘हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन’, ‘आयुर्वेद फॉर किड्स’, ‘सायबर पालकत्व - भाग १ व २’, ‘हॅपिनेस हॅपन्स’, ‘दाही दिशा’, ‘काकासाहेब चितळे’, ‘ज्ञानाई’, ‘सावरकर विचार दर्शन’ आणि ‘गोष्ट पैशापाण्याची’ यांसारखी लोकप्रिय बेस्टसेलर पुस्तकेही येथे उपलब्ध असतील.
पुस्तकप्रेमींनी या महोत्सवाला भेट देत पुस्तकांची खरेदी करावी, असे आवाहन सकाळ प्रकाशनातर्फे केले आहे.


पुस्तक महोत्सवाबाबत अधिक माहिती...
कालावधी आणि वेळ: २० ते २२ मार्च, दररोज सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत.

स्थळ: भगिनी मंडळ हॉल, भिगवण चौक, बारामती.

उपलब्ध पुस्तके: चरित्र, आत्मचरित्र, आध्यात्मिक, उद्योजकता, कृषी आणि बालसाहित्य यांसारख्या विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तकांचा खजिना.
नामवंत लेखक: डॉ. सदानंद मोरे, श्री एम, सरश्री, डॉ. श्री बालाजी तांबे, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या प्रसिद्ध लेखकांची पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध.

वाचकांसाठी विशेष सवलत:
प्रत्येक पुस्तकाच्या खरेदीवर १०% सूट.
₹१००० पेक्षा जास्त खरेदीवर २५% सूट.
ग्रंथालये आणि संस्थांसाठी खरेदीवर ३०% विशेष सूट.
अधिक माहितीसाठी ९१४६०३८०२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com