श्री चैतन्य सेंटर : विश्वासाचे नवे प्रतीक
बारामती, ता. १८ : वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच रुग्णांचा डॉक्टरांवरील अढळ विश्वास हीच कोणत्याही आरोग्यसेवेची खरी ओळख असते. याच विश्वासाच्या पायावर, वंध्यत्वाच्या आव्हानात्मक प्रवासात हजारो दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या ‘श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ने आपल्या यशस्वी वाटचालीची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. बारामतीतून सुरू झालेल्या या केंद्राने केवळ वैद्यकीय उपचार न देता, सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
यशस्वी वाटचालीचा आढावा
बारामती येथे एका छोट्या केंद्रातून सुरू झालेला हा प्रवास आज रुग्णांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अनेक शहरांपर्यंत पोहोचला आहे. रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहता सातारा, अहिल्यानगर, पुणे (हडपसर) आणि सोलापूर येथेही अत्याधुनिक फर्टिलिटी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जागतिक दर्जाच्या आयव्हीएफ, आययूआय सारख्या उपचारांची सुविधा सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देणे, हे या केंद्राचे वैशिष्ट्य ठरले आहे.
१०१ दांपत्यांचे स्वप्न साकार
संस्थेच्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर राबविलेला सामाजिक उपक्रम, केवळ नफा न पाहता सामाजिक बांधिलकी जपत, १०१ गरजू दांपत्यांना विनामूल्य मातृत्व प्राप्त करून देण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांचे संसार फुलले. ‘‘आर्थिक अडचणीत असलेल्या, पण बाळाचे स्वप्न पाहणाऱ्या दांपत्यांना आधार देणे हे आमचे कर्तव्य आहे,’’ असे मत डॉ. आशिष जळक यांनी व्यक्त केले.
नवीन केंद्रांचा मानस
दक्षिण महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, त्यांना सोईस्कर सेवा मिळावी, यासाठी कोल्हापूर आणि दौंड येथे नवीन केंद्रे सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता वटवृक्षात परिवर्तित झाला असून, ‘आई’ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो महिलांसाठी ‘श्री चैतन्य’ हे नाव विश्वासाचे प्रतीक बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

