बारामतीच्या आठ खेळाडूंची तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड
बारामती, ता. २३ : पुणे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने जेजुरी येथील शिवम मंगल कार्यालय येथे झालेल्या दुसऱ्या जिल्हास्तरीय निवड तायक्वांदो स्पर्धेत बारामती तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले. या स्पर्धेत ॲकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
पदकविजेते खेळाडू :
सुवर्णपदक (राज्यस्तरीय निवड) : आरोही जंत्रे, पार्थ मोरे, आयुष धुमाळ, संयोग पंढरपट्टे, अर्णव घुले, शर्विल जोशी, श्रीतेज बोबडे, शंभू शिंदे.
रौप्यपदक : स्मित नांगरे, ईश्वरी हिंगसे, भूमी पिंगळे, स्वरा येळे, सानवी बांडराव, तनिष्क कुंभार, सार्थक ताकमोगे, शरयू माने, अर्पित लोणकर, अद्विका कांबळे, प्रेरणा ईश्वरे.
कांस्यपदक : कीर्ती राठोड, प्राची बोकसे, आरती खैरे, उन्नती शाह, ओजस आगवणे, प्रज्वल शिंदे, शिवांश जाधव, आदर्श सोनवणे, आरुष लोंढे, राधिका राठोड, राजवर्धनी चांदगुडे, निहारिका बनसोडे.
या यशाबद्दल बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उपमुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावला, जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप, बारामती कला-क्रीडा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप लोंढे आणि शीतल शहा (सराफ) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बारामती तायक्वांदो ॲकॅडमीचे अध्यक्ष विशाल माने, तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अजित लोणकर यांनी मार्गदर्शन केल्याचे मास्टर दीपक मोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

