

बारामती, ता. ४ : उद्योगांनी कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करतानाच पर्यावरण संवर्धनासाठी हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी येथे केले.
एमआयडीसी बारामती कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कुरकुंभ येथील सिपला कंपनीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, प्रमोद काकडे, राहुल नलवडे, दर्युस छापखानवाला, आलोक गोयल, नवनाथ काळे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन ही केवळ प्रशासनाची नसून प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. उद्योगांनी हरित प्रकल्प राबवून ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. चर्चासत्रात उद्योजकांनी मांडलेल्या सूचनांवर सकारात्मक विचार करून एमआयडीसी आवश्यक सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.