बारामती आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ. रेवती संत

बारामती आयएमएच्या 
अध्यक्षपदी डॉ. रेवती संत
Published on

बारामती, ता. ५ : येथील बारामती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) २०२६-२७ या वर्षासाठी डॉ. रेवती संत यांची अध्यक्षपदी झाली. नुकत्याच झालेल्या पदग्रहण कार्यक्रमात त्यांनी पदभार स्विकारला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सचिन सातव होते. यावेळी डॉ. रवींद्र राजे, आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तांबे उपस्थित होते. तसेच, यावेळी उपाध्यक्षपदी डॉ. दिनेश ओसवाल व डॉ. मृणालिनी जळक, सचिवपदी डॉ. अंजली खडे, तर कोषाध्यक्षपदी डॉ. ज्योती चांदगुडे यांची निवड करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जीवराज शहा व डॉ. रेखा रवींद्र राजे यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार देऊन, तर क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. रोहन खवटे यांचा गौरव करण्यात आला. मावळते अध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव डॉ. अमोल भंडारे व कोषाध्यक्ष डॉ. सौरभ निंबाळकर यांनी गतवर्षाचा आढावा सादर केला.
सूत्रसंचालन डॉ. प्रियांका आटोळे यांनी केले, तर डॉ. संदेश बोबडे यांनी आभार मानले.

14803

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com