बारामती न्यायालयाची भोंदूबाबाला सक्तमजुरी

बारामती न्यायालयाची भोंदूबाबाला सक्तमजुरी
Published on

बारामती, ता. ६ : पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मिलिंद मदन जाधव (वय ४५, रा. धोपवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी शिक्षा सुनावली.

जाधव याने फिर्यादी व अन्य महिलांना अघोरी पूजेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलांवर अत्याचार करण्यात आले तसेच आर्थिक फसवणूकही केली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांनी सात साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षींसह मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.

या खटल्यात सरकारी वकील कार्यालयातील सुनीता कांबळे, कोर्ट पैरवी अधिकारी फौजदार गोरख कसपटे, सहायक फौजदार अभिमन्यु कवडे तसेच पोलिस हवालदार रेणुका पवार यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com