

बारामती, ता. ११ : सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी महावितरणकडून बारामती परिमंडळात सोमवार (ता. १३) ते मंगळवार (ता.२१) एप्रिलदरम्यान उपविभागनिहाय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरांत सौर कृषी पंप बसलेला नसणे, बसविल्यानंतर पंप सुरू न होणे, पंप अथवा संबंधित साहित्य चोरीला जाणे यांसह विविध तांत्रिक तक्रारींचा समावेश असणार आहे. बारामती मंडळात ‘कुसुम ब’ तसेच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ११ हजार ११३ पंपांची स्थापना करण्यात आली आहे.
या महिन्यातील शिबिरांचे वेळापत्रक (ठिकाण व तारिक बारामती शहर (ता. १३), बारामती ग्रामीण व सोमेश्वर (ता. १३); इंदापूर व वालचंदनगर (ता. १५); शिरूर व शिक्रापूर (ता. १६); केडगाव व दौंड (ता. १७); भोर (ता. २०); तर सासवड व नीरा (ता. २१) येथे शिबिरे होणार आहेत.
उपविभागनिहाय लाभार्थी संख्या अशी :
बारामती शहर........२५,
बारामती ग्रामीण........८७९,
सोमेश्वर........५२७,
इंदापूर........१२८६,
वालचंदनगर........१००६,
केडगाव........६६७,
दौंड........११६७,
शिरूर........३२३९,
शिक्रापूर........१४५४,
सासवड........७१९,
नीरा........११०
भोर........२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.