बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
Published on

बारामती, ता. २१ : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गुरुवारी (ता. २३) होणार असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहाय्यक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली.

निवडणूक व्यवस्था
• मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती
• सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा
• कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्ही व पोलिस बंदोबस्त
• आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी

मतदार व मतदान केंद्रे
• एकूण मतदार : ३,८४,५७९
o पुरुष : १,९३,८७१
o महिला : १,९०,६८४
o तृतीयपंथी : २४
• एकूण मतदान केंद्रे : ४७८
मतदान यंत्रणा
• ईव्हीएम : ४७८
• बॅलेट युनिट्स : ९५६
• व्हीव्हीपॅट : ४७८
• राखीव यंत्रे :
o ईव्हीएम व व्हीव्हीपॅट : ६०
o बॅलेट युनिट्स : १२०
वाहतूक व्यवस्था
• एकूण वाहने : १६५
o क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी : ६०
o ईव्हीएम वाहतुकीसाठी मिनी टेम्पो : ६०
o कर्मचाऱ्यांसाठी बसेस : ४५
मतदान केंद्रांवरील सुविधा
• पिण्याचे पाणी
• स्वच्छतागृहे
• वैद्यकीय संच
• मंडप व्यवस्था
• माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका उपलब्ध
सुरक्षा व नियंत्रण
• ८ तपासणी नाके (चेक पोस्ट)
• १६ स्थिर पथके
• ८ भरारी पथके
• एकूण ९६ कर्मचारी नियुक्त
मतमोजणी
• ता. ४ मे २०२६
• ठिकाण : एमआयडीसी, बारामती येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम

प्रशासनाचे आवाहन
• आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
• मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कृती टाळाव्यात
• सर्व पात्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे
• निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com